Wednesday 6 April 2016

Mothers Day Poems in Marathi – Free Collection in Marathi Language

Mothers Day Poems in Marathi – This year in 2016, Mother’s day would be celebrated on 10th may. It is a happiest and highly memorable day of the year for every kids, children and students. Mother’s day is a special day of the year which has been dedicated for all mothers. If you are searching for Mothers Day Poems in Marathi Language to dedicate your Aai then you have landed at the right place. Here we are sharing the best and free collection of Mothers Day Poems in Marathi.

Mothers Day Poems in Marathi

आई
आई साठी काय लिहू, आई साठी कसे लिहू,
आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे,
आई वरती लिहिण्यैतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे,
जीवन हे शेत तर आई म्हणजे विहिर,
जीवन हे नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हे शाळा तर आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी,
आई तू उन्हामधली सावली,
आई तू पावसातली छत्री,
आई तू थंडीतली शाल,
आता यावीत दुःखे खुशाल,
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगनातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुनगुनावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्याव अस थंडगार पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाली,
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी..!

Marathi Mother’s Day Poems

सकाळी सकाळी धपाटे घालुन उठवते, ती असते आई..!
उठल्या उठल्या आवडीचा नाश्ता बनवून देते, ती असते आई…!
नाश्ता संपवायच्या आत डब्याची काळजी करते, ती असते आई…!
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ काही आवडीचे करून देते, ती असते आई..!
साडीला हात पुसत व्यवस्थित जा म्हणते, ती असते आई…!
परतण्याची आतुरतेने वाट बघत बसते, ती असते आई…!
आपण झोपेपर्यंत सतत जागी राहते, ती असते आई..!
आणि जिच्याशिवाय आपल संपूर्ण आयुष्यच अपूर्ण असते..!
ती असते आई..! ती असते आई..!

Mothers Day Poems in Marathi from Daughter

आई’ हा शब्द पहिल्यांदा उच्चारणं असते एक आठवण!
आईचं बोट धरून रांगणारा पोर चालू लागतो ती असते आठवण!
भुकेलेल्या पिलाला घास भरवते आई.., ती एक आठवण..!
आईच्या डोळ्यांदेखत मुलं आकाशात उंच झेप घेतात ती असते आठवण.!
सरतेशेवटी “आई तुला नाही गं कळत यातलं काही” असं म्हणण्याजोगी मोठी होतात मुलं..
ती एक आठवण..
If you love this best collection of Marathi Mothers Day Poems then please share it on Facebook, Twitter, Google+, WhatsApp and other social sites by using below given social buttons. You can also give your valuable feedback in the comments form at the end.

No comments:

Post a Comment